48 मीच जीवनाची भाकर आहे. 49 तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला आणि ते मरण पावले.
50 पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. 51 स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे."