3 म्हणून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, "तू इथून नीघ आणि यहूदीया प्रांतात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत. 4 जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही. तू या गोष्टी करीत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो." 5 कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.