31 ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, "तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. 32 तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील." 33 त्यांनी त्यास उत्तर दिले, "आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत आणि कधीही कोणाचे दास झालो नाही. तुम्ही आम्हास कसे म्हणता की, तुम्ही स्वतंत्र केले जाल?" 34 येशूने त्यांना उत्तर दिले, "मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. 35 दास सर्वकाळ घरात राहत नाही; पुत्र सर्वकाळ घरात राहत. 36 म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही, खरोखर, बंधनमुक्त व्हाल.
Publicidade
योहान 8:31-36
IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
Em outras traduções
- OMRCV Marathi Contemporary Version
31 ज्या यहूदी पुढार्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, "जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल. 32 मग तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल."
33 त्यांनी उत्तर दिले, "आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर आम्हाला स्वतंत्र करण्यात येईल, असे तुम्ही कसे म्हणता?"
34 त्यावर येशूंनी उत्तर दिले, "मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे. 35 आता दासाला कुटुंबात कायम राहता येत नाही, परंतु पुत्र तिथे सदासर्वदा राहतो. 36 म्हणून पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केले, तरच तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल.
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.