4 "गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. 5 मोशेने नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावी, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?" 6 त्यास दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. पण येशू खाली आणून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. 7 आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, "तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा." 8 मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. 9 हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो सरळ शेवटल्या मनुष्यापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले, येशू एकटा राहिला आणि ती स्त्री मध्यभागी उभी होती. 10 नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणीही नाही असे पाहून तिला म्हणाला, "मुली, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?" 11 ती म्हणाली, "प्रभूजी, कोणी नाही." तेव्हा येशू तिला म्हणाला, "मी देखील तुला दोषी ठरवीत नाही; जा, यापुढे पाप करू नको."
Publicidade