14 मी जन्मलो तो दिवस शापित असो.
ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्म घेतला, तो दिवस आशीर्वादीत न होवो.
15 तुम्हास मुलगा झाला, असे बोलून माझ्या जन्माची बातमी माझ्या वडिलांना देऊन त्यांना आनंदी करणारा मनुष्य शापित असो,
16 परमेश्वराने दया न दाखवता नाश केलेल्या शहरांसारखा तो मनुष्य होवो.
तो सकाळी मदतीचा शब्द आणि दुपारी युद्धाची गदारोळ ऐको.
17 कारण त्याने मला उदरातच मारुन टाकले नाही, कारण अशाने माझी आई माझी कबर झाली असती व तिचे गर्भस्थान सगर्भ राहीले असते.
18 मी फक्त क्लेश व दु:ख पाहिले आणि जीवन नामुष्की याकरीताच गर्भस्थानातून बाहेर का निघालो?