16 तेव्हा लोकांनी असे उत्तर केले की, "परमेश्वर देवाला सोडून आम्ही दुसऱ्या देवांची सेवा कधीच करणार नाही; 17 कारण परमेश्वर आमचा देव आहे; त्यानेच आम्हांला व आमच्या पूर्वजांना मिसर देशांच्या दास्यातून बाहेर आणले; आणि ज्याने आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले, आणि ज्या वाटेने आम्ही गेलो व ज्या ज्या राष्ट्रामधून आम्ही मार्गक्रमण केले त्यामध्ये त्याने आमचे रक्षण केले,
Publicidade
Publicidade