मरीयेचे स्तोत्र
46 मरीया म्हणाली,
"माझा जीव प्रभूला थोर मानतो,
47 आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी
माझा आत्मा आनंदीत झाला आहे.
48 कारण त्याने आपल्या दासीची दैन्य अवस्था पाहीली.
आतापासून मला सर्व पिढ्या धन्य म्हणतील.
49 कारण जो सर्वसमर्थ आहे
त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहेत;
आणि त्याचे नाव पवित्र आहे.
50 जे त्याचे भय धरतात
त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे
51 त्याने त्याच्या हाताने सामर्थ्याची कार्ये केली आहेत;
जे गर्विष्ठ अंतःकरणाचे आहेत
त्यांची त्याने पांगापांग केली आहे.
52 त्याने राज्य करणाऱ्यांना
त्यांच्या राजासनांवरून ओढून काढले आहे
आणि गरीबास उंचावले आहे.
53 त्याने भूकेल्यास चांगल्या पदार्थांने तृप्त केले आहे.
आणि धनवानास रिकाम्या हाताने परत पाठवले आहे.
54 दयेपोटी त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.
55 आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम
व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरण करावी.
त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे."