शाश्वत जीवन प्राप्ती कशी करून घ्यावी?
25 नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, "गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहीजे?" 26 तेव्हा येशू त्यास म्हणाला, "नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यामध्ये काय वाचतोस?" 27 तो म्हणाला, "तू तुझा देव प्रभू याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तीने प्रीती कर." व स्वतःवर जशी प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर. 28 तेव्हा येशू त्यास म्हणाला, "तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू जगशील."