2 मग तो त्यांना म्हणाला, "जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणाः
हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो,
3 आमची दररोजची लागणारी भाकर आम्हास दे,
4 आमच्या पापांची आम्हास क्षमा कर,
कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला
त्यांच्या अपराधांची क्षमा करतो
आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस
तर आम्हास वाईटापासून सोडव."