मोहरीच्या दाण्याचा व खमिराचा दृष्टांत
18 मग तो म्हणाला, "देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्यास कशाची उपमा देऊ. 19 देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला व ते वाढून त्याचे मोठे झाड झाले आणि आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली."