जलोदर झालेल्या मनुष्यास शब्बाथ दिवशी बरे करणे
1 एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते. 2 आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता. 3 येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, "शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?" 4 परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी मनुष्यास धरुन त्यास बरे केले व त्यास पाठवून दिले.