Pular para o conteúdo
Publicidade

लूक 15:1-7

हरवलेले मेंढरू

1 सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते. 2 तेव्हा परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले. ते म्हणू लागले, "हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो!"

3 मग येशूने त्यांनाही दाखला सांगितला. 4 "तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानात सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय? 5 आणि जेव्हा त्यास ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो. 6 आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र करून म्हणतो, माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे. 7 त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.