Pular para o conteúdo
Publicidade

लूक 23:39-43

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

39 तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव! 40 पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, "तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. 41 पण आपली शिक्षा योग्य आहे कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही." 42 नंतर तो म्हणाला, "येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर." 43 येशू त्यास म्हणाला, "मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील."

मत्त. 27:45-56; मार्क 15:33-41; योहा. 19:25-30

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    39 गुन्हेगारांपैकी एकजण त्यांची निंदा करून म्हणाला, "तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव."

    40 पण दुसर्‍या गुन्हेगाराने पहिल्याला दटावून म्हटले, "तुला परमेश्वराचे भय वाटत नाही काय, तू सुद्धा तीच शिक्षा भोगीत आहेस? 41 आपल्या दुष्ट कृत्यांमुळे आपणास झालेली मरणाची शिक्षा अगदी यथायोग्य आहे. पण याने तर काहीही चूक केली नाही."

    42 मग तो येशूंना म्हणाला, "अहो येशू, आपण आपल्या राज्यात याल, तेव्हा माझी आठवण ठेवा.23:42 काही मूळ प्रतींमध्ये आपल्या राजाधिकाराने याल."

    43 येशूंनी त्याला उत्तर दिले, "मी तुला निश्चित सांगतो की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.