40 पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, "तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. 41 पण आपली शिक्षा योग्य आहे कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही." 42 नंतर तो म्हणाला, "येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर." 43 येशू त्यास म्हणाला, "मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील."