येशूची वंशावळ
23 जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्यास योसेफाचा मुलगा समजत. योसेफ एलीचा मुलगा होता 24 एली मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा, लेवी मल्खीचा, मल्खी यन्रयाचा, यन्रया योसेफाचा मुलगा होता. 25 योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसाचा, अमोस नहूमाचा, नहूम हेस्लीचा, हेस्ली नग्गयाचा, 26 नग्गय महथाचा, महथ मत्तिथ्याचा, मत्तिथ्य शिमयीचा, शिमयी योसेखाचा, योसेख योदाचा मुलगा होता. 27 योदा योहानानाचा मुलगा होता. योहानान रेशाचा, रेशा जरूब्बाबेलाचा, जरूब्बाबेल शल्तीएलाचा, शल्तीएल नेरीचा, 28 नेरी मल्खीचा, मल्खी अद्दीचा, अद्दी कोसोमाचा, कोसोम एल्मदामाचा, एल्मदाम एराचा, 29 एर येशूचा, येशू अलिएजराचा, अलिएजर योरीमाचा, योरीम मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा मुलगा होता. 30 लेवी शिमोनाचा मुलगा होता. शिमोन यहूदाचा, यहूदा योसेफाचा, योसेफ योनामाचा, योनाम एल्याकीमाचा, 31 एल्याकीम मल्लयाचा, मल्लया मिन्नाचा, मिन्ना मत्ताथाचा, मत्ताथ नाथानाचा, नाथान दाविदाचा, 32 दावीद इशायाचा, इशाय ओबेदाचा, ओबेद बवाजाचा, बवाज सल्मोनाचा, सल्मोन नहशोनाचा मुलगा होता. 33 नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अदामीनचा, अदामीन अर्णयाचा, अर्णय हेस्रोनाचा, हेस्रोन पेरेसाचा, पेरेस यहूदाचा, 34 यहूदा याकोबाचा, याकोब इसहाकाचा, इसहाक अब्राहामाचा, अब्राहाम तेरहाचा, तेरह नाहोराचा, 35 नाहोर सरुगाचा, सरुग रऊचा, रऊ पेलेगाचा, पेलेग एबराचा, एबर शेलहाचा मुलगा होता. 36 शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा, अर्पक्षद शेमाचा, शेम नोहाचा, नोहा लामेखाचा, 37 लामेख मथुशलहाचा, मथुशलह हनोखाचा, हनोख यारेदाचा, यारेद महललेलाचा, महललेल केनानाचा, 38 केनान अनोशाचा, अनोश शेथाचा, शेथ आदामाचा, आदाम देवाचा पुत्र होता.