Pular para o conteúdo
Publicidade

लूक 4:16-21

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

16 मग जेथे तो लहानाचा मोठा झाला होता त्या नासरेथांत तो आला आणि शब्बाथ दिवशी त्यांच्या प्रथेप्रमाणे सभास्थानात जाऊन ग्रंथ वाचण्यासाठी उभा राहिला, 17 आणि यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्यास देण्यात आला. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्याठिकाणी असे लिहिले आहे,

18 "प्रभूचा आत्मा मजवर आला आहे,

कारण, गरिबांना सुवार्ता सांगण्यास

त्याने मला अभिषेक केला आहे.

कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी,

आणि आंधळ्यांना दृष्टी पुन्हा मिळावी,

ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी

19 आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी

त्याने मला पाठवले आहे."

20 मग त्याने ग्रंथपट बंद करून सभास्थानाच्या सेवकाला परत करून तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येकजण त्याच्याकडे रोखून पाहत होता. 21 त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली की, "तुमच्या ऐकण्यामुळे आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे."

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    16 ज्या नासरेथ गावी त्यांची वाढ झाली होती, तिथे ते आले व नेहमीप्रमाणे शब्बाथ दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे सभागृहामध्ये पवित्रशास्त्र वाचण्यासाठी उभे राहिले. 17 यशायाह संदेष्ट्याचे भविष्य असलेल्या अभिलेखाची गुंडाळी त्यांच्या हाती देण्यात आली आणि त्यांनी ती उघडली, ज्यात असे लिहिलेले होते:

    18 "परमेश्वराचा आत्मा मजवर आहे,

    कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी

    प्रभूने माझा अभिषेक केला आहे.

    कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी,

    अंधांना दृष्टी देण्यासाठी,

    त्यांनी मला पाठविले आहे.

    19 प्रभूच्या कृपेचे वर्ष जाहीर करण्यास पाठविले आहे."4:19 यश 61:1, 2 यश 58:6

    20 नंतर गुंडाळी गुंडाळून, ती सेवकाकडे दिली व ते खाली बसले. सभागृहामधील प्रत्येक व्यक्तीची नजर त्यांच्यावर एकवटली होती. 21 येशू पुढे त्यांना म्हणाले, "हा शास्त्रलेख जो आज तुम्ही ऐकत आहात, तो पूर्ण झाला आहे."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.