पहिल्या शिष्यांना पाचारण
16 येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. 17 येशू त्यांना म्हणाला, "माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन." 18 मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.