याकोब व योहान याची विनंती
35 याकोब व योहान हे जब्दीचे पुत्र त्याच्याकडे आले आणि त्यास म्हणाले, "गुरुजी, आम्ही आपणाजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे." 36 येशू त्यांना म्हणाला, "मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?" 37 ते म्हणाले, "आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसण्याचा अधिकार द्यावा."