अंजिराचे निष्फळ झाड
12 दुसऱ्या दिवशी, ते बेथानीहून निघाल्यानंतर येशूला भूक लागली. 13 त्यास पानांनी भरलेले अंजिराचे एक झाड दुरून दिसले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्यास पानांशिवाय काही आढळले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता. 14 नंतर तो त्यास म्हणाला, "यापुढे सर्वकाळ तुझे फळ कोणीही खाणार नाही." त्याच्या शिष्यांनी हे ऐकले.