22 येशूने उत्तर दिले, "देवावर विश्वास ठेवा. 23 मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. 24 म्हणून मी तुम्हास सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल. 25 जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी.
Publicidade
मार्क 11:22-25
IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
Em outras traduções
- OMRCV Marathi Contemporary Version
22 येशूंनी उत्तर दिले, "परमेश्वरावर विश्वास ठेवा, 23 मी तुम्हाला निश्चित11:23 काही मूळ प्रतींमध्ये जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर येशू म्हणाले खरोखर सांगतो की, जर कोणी या डोंगराला, ‘ऊठ आणि समुद्रात जाऊन पड,’ असे म्हणेल आणि अंतःकरणात संशय न धरता आपण म्हटले तसे होईल असा विश्वास धरला, तर ती गोष्ट त्यांच्यासाठी केली जाईल. 24 यास्तव मी तुम्हाला सांगतो की, प्रार्थना करून जे काही मागाल, ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल. 25 आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्याची क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला तुमच्या पातकांची क्षमा करतील.
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.