61 परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही. नंतर महायाजकाने पुन्हा विचारले, "धन्यवादिताचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस काय?" 62 येशू म्हणाला, "मी आहे,
आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ
देवाच्या उजवीकडे बसलेले
व आकाशातील मेघांसह येताना पाहाल."