येशूचे वास्तविक नातेवाईक
31 तेव्हा येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्यास बोलावले. 32 लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, "तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत." 33 त्याने त्यांना उत्तर दिले, "माझी आई व माझे भाऊ कोण आहेत?" 34 मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, "पाहा माझी आई आणि माझे भाऊ. 35 जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई."