39 मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, "शांत हो! स्तब्ध राहा." मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली. 40 तो त्यांना म्हणाला, "तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजूनही विश्वास कसा काय नाही?" 41 परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, "हा आहे तरी कोण, वारा आणि समुद्रदेखील याचे ऐकतात." असा हा आहे तरी कोण?