Pular para o conteúdo
Publicidade

मार्क 9:17,22-24

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

17 तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, "गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले. त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही.

22 पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा." 23 येशू त्यास म्हणाला, "शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे." 24 तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, "मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका."

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    17 गर्दीतील एक मनुष्य उत्तरला, "गुरुजी, मी माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन आलो, त्याला दुरात्म्याने पछाडलेले आहे व त्याने त्याची वाणी हिरावून घेतली आहे;

    22 त्याने मुलाला अनेकदा जिवे मारण्याकरिता विस्तवात, नाही तर पाण्यात फेकून दिले आहे. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर आमच्यावर दया करा आणि आम्हाला मदत करा."

    23 "जर तुम्हाला शक्य असेल?" येशू म्हणाले, "जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे."

    24 मुलाच्या वडिलांनी झटकन उत्तर दिले, "मी विश्वास ठेवतो, माझा अविश्वास दूर करण्यास मला साहाय्य करा!"

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.