29 येशू म्हणाला, "ये." मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला. 30 पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला "प्रभूजी, मला वाचवा." 31 आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, "अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?"