3 येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, "तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता? 4 कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आई-वडीलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आई-वडीलांबद्दल वाईट बोलतो, त्यास जिवे मारावे.’ 5 पण तुम्ही म्हणता, ‘जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते, ते मी देवाला अर्पण केले आहे.’ 6 ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.