नम्रतेविषयी धडा
1 त्यावेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी विचारले, "स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?" 2 तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले, 3 आणि म्हटले, "मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. 4 म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे.