कृतघ्न चाकराचा दुष्टांत
21 नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, "प्रभू, जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्यास किती वेळा क्षमा करावी? मी त्यास सात वेळा क्षमा करावी काय?" 22 येशूने उत्तर दिले, "मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर साताच्या सत्तरवेळा अन्याय केला तरी तू त्यास क्षमा करीत राहा."