Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 18:6-9

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

दुसर्‍यांस अडखळविणाऱ्यांना इशारा

6 परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्यास समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या हिताचे आहे. 7 अडखळण्याच्या कारणामुळे जगाला धिक्कार असो! तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या अडखळण्याला कारणीभूत होतील त्यांना फार हानीचे ठरेल. 8 जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. दोन हात व दोन पाय असून सर्वकाळच्या कधीही न विझणाऱ्या अग्नीत नरकात तुम्ही टाकले जाण्यापेक्षा व्यंग किंवा लंगडे होऊन सार्वकालिक जीवनात जावे जास्त बरे होईल. 9 जर तुमचा डोळा तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या कारण एकच डोळा असला आणि तुम्हास सार्वकालिक जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यासह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    6 "जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या अशा लहानातील एकालाही अडखळण आणतो, तर त्यांच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून समुद्रात फेकून देणे हे त्यांच्यासाठी अधिक हिताचे ठरेल. 7 ज्याच्यामुळे लोकांना अडखळण येतात त्या जगाचा धिक्कार असो! अडखळण येणारच नाही हे अशक्य आहे, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याला धिक्कार असो. 8 तुझा हात किंवा पाय तुम्हाला अडखळण करीत असेल तर तो कापून टाकून दे. दोन पाय असून शाश्वत अग्नीत टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे 9 जर तुझा डोळा तुला अडखळण करीत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळ्यांसह अग्नीच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने जीवनात जाणे उत्तम आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.