येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो
13 नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली. येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले. 14 परंतु येशू म्हणाला, "लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे." 15 मुलांवर हात ठेवल्यावर येशू तेथून निघून गेला.