श्रीमंतीपासून होणारे तोटे
23 तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी तुम्हास खरे सांगतो, धनवान मनुष्यास स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. 24 मी तुम्हास सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे." 25 जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, "मग कोणाचे तारण होईल?" 26 येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, "मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत."