15 परंतु जेव्हा मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि परमेश्वराच्या भवनाच्या आवारात लहान मुलांना, "दाविदाच्या पुत्राला होसान्ना." अशी घोषणा देताना पाहिले, तेव्हा त्यांना संताप आला. 16 त्यांनी त्यास विचारले, "ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?" येशूने त्यांना उत्तर दिले, "होय.
परंतु तू बालके व तान्हुली
यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे.
हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?"