मंदीराची धूळधाण व युगाची समाप्ती याविषयीचे येशूचे भविष्य
1 मग येशू परमेश्वराच्या भवनातून बाहेर येऊन पुढे जात होता, त्याचे शिष्य त्याच्याकडे त्यास परमेश्वराचे भवन दाखवायला आले. 2 परंतु त्याने, त्यांना उत्तर देऊन म्हटले, "तुम्ही या सर्व गोष्टी पाहता ना? आता, मी तुम्हास खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहू दिला जाणार नाही."