यहूदाचा मृत्यू
3 तेव्हा येशू दंडास पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्यास शत्रूच्या हाती देणारा यहूदा पस्तावला, म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक लोक व वडिलांकडे परत आला. 4 तो म्हणाला, "मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे" यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, "आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!" 5 तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी परमेश्वराच्या भवनात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.