प्रथम शिष्यांना पाचारण
18 नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते. 19 येशू त्यांना म्हणाला, "माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन."