गुप्त दानधर्म
2 म्हणून ज्यावेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे. 3 म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल, तेव्हा ते गुप्तपणे करा. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. 4 जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे, तो त्याचे प्रतिफळ तुला देईल.