प्रभूची प्रार्थना
9 म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः
हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानले जावो.
10 तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात
तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
11 आमची रोजची भाकर आज आम्हास दे.
12 जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत,
तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड.
13 आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस
तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)