20 मग पाहा, वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव होत असलेली एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली. 21 कारण ती आपल्या मनात म्हणत होती, "मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन." 22 तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, "मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे." आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.