23 मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहीले, 24 तो म्हणाला, "वाट सोडा, कारण मुलगी मरण पावलेली नाही; ती झोपेत आहे." तेव्हा ते त्यास हसू लागले. 25 मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली.