Pular para o conteúdo
Publicidade

गणना 15:37-41

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

वस्त्राच्या काठांना लावायचे गोंडे

37 परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला 38 इस्राएली वंशजाशी बोल आणि त्यांना आज्ञा कर की, त्यांनी पिढयानपिढया आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर एक निळा दोरा बांधा. 39 या गोंड्याचा उद्देश असा की, ते बघून परमेश्वराने दिलेल्या सगळ्या आज्ञा लक्षात ठेवाल व आज्ञा पाळाल. तुमचे हृदय व तुमची दृष्टी ज्यांच्यामागे जाऊन तुम्ही व्यभिचारी होत असा, त्याच्यामागे तुम्ही जाऊ नये.

40 "माझ्या सगळ्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवावे. आपल्या देवाकरता पवित्र व्हावे. 41 मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हास मिसर देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मीच तुमचा देव परमेश्वर आहे."

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    37 याहवेह मोशेला म्हणाले, 38 "इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: येणार्‍या सर्व पिढ्यांपर्यंत तुम्ही आपल्या वस्त्राच्या काठांना गोंडे लावावे, प्रत्येक गोंड्यावर निळा दोरा असावा. 39 ते यासाठी की तुम्ही त्यांच्याकडे पाहावे व याहवेहच्या सर्व आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे, म्हणजे तुम्ही त्यांचे पालन करावे आणि आपल्या अंतःकरणाच्या व डोळ्यांच्या वासनांच्या मागे लागून व्यभिचार करू नये. 40 मग तुम्हाला माझ्या सर्व आज्ञांचे पालन करण्याची आठवण राहील आणि तुम्ही तुमच्या परमेश्वरासाठी पवित्र राहाल. 41 तुमचा परमेश्वर व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले तो मीच याहवेह आहे. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.