10 मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. 11 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील,
आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’
12 तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.