Pular para o conteúdo
Publicidade

रोमकरांस पत्र 14:13,15,17

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

13 तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये. 15 पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस. 17 कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    13 यास्तव आपण यापुढे एकमेकांना दोषी ठरवू नये; तर असा निश्चय करावा की कोणी आपल्या बंधू किंवा भगिनीपुढे काही विघ्न किंवा अडखळण ठेवू नये. 15 तुझ्या बंधूला किंवा भगिनीला अन्नामुळे क्लेश झाले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस. ज्यासाठी ख्रिस्त मरण पावले त्यांचा नाश तुझ्या खाण्यामुळे करू नको. 17 परमेश्वराचे राज्य खाणे व पिणे यात नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.