Pular para o conteúdo
Publicidade

रूथ 4:13-22

13 मग बवाजाने रूथशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. 14 तेव्हा तेथील स्त्रिया नामीला म्हणाल्या, "परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही, त्याचे नाव इस्राएलात प्रसिद्ध होवो. 15 तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृद्धापकाळी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीती करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे."

16 तेव्हा नामीने ते बालक घेतले आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली. 17 "नामीला पुत्र झाला" असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला.

18 पेरेशाची वंशावळ: पेरेस हेस्रोनाचा पिता झाला, 19 हेस्रोन रामचा पिता झाला, राम अम्मीनादाबाचा पिता झाला, 20 अम्मीनादाब नहशोनाचा पिता झाला, नहशोन सल्मोनाचा पिता झाला, 21 सल्मोन बवाजाचा पिता झाला, बवाज ओबेदाचा पिता झाला, 22 ओबेद इशायाचा पिता झाला आणि इशाय दाविदाचा पिता झाला.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

Rute
Ver todos os capítulos de Rute