Pular para o conteúdo
Publicidade

याकोबाचे पत्र 2:14-26

श्रद्धा व कार्य ह्यावर सूचना

14 माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की "माझ्याजवळ विश्वास आहे"; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्यास काय लाभ? विश्वास त्यास तारू शकेल काय? 15 जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल, 16 आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, "शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा," पण शरीरासाठी लागणार्‍या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ? 17 म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे. 18 आता, कोणी मनुष्य म्हणेल की, "तुझ्याजवळ विश्वास आहे आणि माझ्याजवळ कृती आहेत." तुझ्या कृतींशिवाय तुझा विश्वास मला दाखव आणि मी माझ्या कृतीवरून माझा विश्वास तुला दाखवीन. 19 एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? भूतेसुद्धा विश्वास धरतात व थरथर कापतात. 20 परंतु मूर्ख मनुष्या, कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावे अशी तुझी इच्छा आहे काय? 21 आपला पूर्वज अब्राहाम ह्याने आपला मुलगा इसहाक ह्याला जेव्हा यज्ञवेदीवर अर्पण केले, तेव्हा तो कृतीनी नीतिमान ठरला नव्हता काय? 22 आता, त्याच्या कृतीबरोबर विश्वासाने कसे काम केले आणि त्या कृतीकडून विश्वास पूर्ण केला गेला, हे तुला दिसते का? 23 ‘अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व गणण्यात आले’, हे म्हणणारा शास्त्रलेख पूर्ण झाला आणि त्यास देवाचा मित्र म्हणण्यात आले. 24 तर तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतीनी नीतिमान ठरतो. 25 तसेच राहाब वेश्येने जेव्हा जासुसांना आत घेतले व दुसर्‍या वाटेने पाठवून दिले, तेव्हा ती कृतीनी नीतिमान ठरली नाही काय? 26 कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.