बढाई मारू नये म्हणून इशारा
13 अहो! तुम्ही जे म्हणता की, "आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू." 14 पण उद्या काय होईल हे तुम्हास माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते. 15 त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, "परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू." 16 आता, तुम्ही आपल्या योजनेचा अभिमान मिरवता. अशा प्रकारचा सर्व अभिमान व्यर्थ आहे. 17 म्हणून चांगले करणे कळत असून, जो ते करीत नाही त्यास ते पाप आहे.