Pular para o conteúdo
Publicidade

याकोबाचे पत्र 4:4,6-8

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

4 हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे. 6 पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, "देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो." 7 म्हणून देवाच्या अधीन रहा; आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. 8 तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    4 व्यभिचारी लोकांनो,4:4 कराराच्या विश्वास घातकीपणाचा संदर्भ; पाहा होशे 3:1. जगाशी मैत्री परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हाला समजत नाही काय? यास्तव, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो तो परमेश्वराचा शत्रू झाला आहे. 6 परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते,

    "परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात

    परंतु नम्रजनावर कृपा करतात."4:6 नीती 3:34

    7 तुम्ही स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा. सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल; 8 तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.