4 पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली, 5 तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्त्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीनिकरणाने तारले. 6 आणि आपल्या तारक येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर तो आत्मा विपुलतेने ओतला.