आध्यात्मिक दानांसंदर्भात
1 आता, बंधूंनो आणि भगिनींनो, आत्मिक दानांसंदर्भात तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही. 2 तुम्हाला आठवतच असेल की तुम्ही गैरयहूदी होता, तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारे का होईना मुक्या मूर्तींच्या प्रभावाखाली भटकले गेला होता. 3 याच कारणासाठी तुम्हाला हे समजावे की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही "येशू शापित असो" असे म्हणणार नाही आणि कोणी मनुष्य पवित्र आत्म्याशिवाय, "येशू प्रभू आहे" असेही म्हणणार नाही.
4 निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे. 5 सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. 6 कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत.
7 आता प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक कल्याणासाठी होते.