54 जेव्हा जे नाशवंत आहे ते अविनाशीपण परिधान करेल, आणि जे मर्त्य आहे ते अमरत्व, तेव्हा हे शास्त्रलेखातील वचन सत्य होईल: "विजयाने मृत्यूला गिळून टाकले आहे."15:54 यश 25:8
55 "अरे मरणा, तुझा विजय कुठे?
अरे मरणा, तुझी नांगी कुठे?"15:55 होशे 13:14
56 कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. 57 परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.