अनीतिमान बंधूला बहिष्कृत करा
1 मला असा अहवाल मिळाला आहे की तुमच्यामध्ये लैंगिक अनैतिकता आहे, की जी गैरयहूदीही खपवून घेणार नाहीत; कोणाएका मनुष्याने आपल्या वडिलांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले आहेत. 2 आणि तुम्ही अभिमान बाळगता! याउलट दुःखाने ज्या मनुष्याने असे केले, त्याला सहभागितेतून घालवून द्यावयाचे नव्हते का?